अहमदनगर दक्षिण

लेकीला भेटण्यासाठी चाललेल्या ‘त्या’ महिलेसोबत घडले असे काही की..? नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- लेकीकडे भेटण्यासाठी निघालेल्या एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शेवगाव बसस्थानकावर काल भर दुपारी घडला.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे आधीच परिस्थितीने गरीब असलेल्या हातबल वृध्द महिलेस अक्षरशः रडू कोसळले. दरम्यान सायंकाळी उशीरा चंद्रकला भानुदास ढोले ( रा. येळी ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी माया कल्याण भोसले (रा. हातगाव ता. शेवगाव) व एक अनोळखी महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला.

याबाबत माहिती अशी की, चंद्रकला ढोले या पती व नातवासमवेत येळी येथून वाळूंज औरंगाबाद येथे जाण्यासाठी पाथर्डीहून शेवगाव बसस्थानकावर आल्या होत्या.

पाथर्डी नाशिक बस ( एस.एच११.बी.एल.९२४०) मध्ये चढत असतांना त्यांच्या गळयातील एक तोळे वजनाचे सोन्याचे मनिमंगळसुत्र तोडून लंपास करण्यात आले.

त्याच वेळी ढोले यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी चालक व वाहकास सांगून बस पोलिस ठाण्यात आनली. बसमध्ये त्यांच्या मागे व पुढे असणा-या महिलांची व इतर प्रवाशांची झडती घेण्यात आली.

मात्र ते मनिमंगळसूत्र मिळाले नाही. त्यानंतर ढोले यांच्या फिर्यादीवरुन बसमध्ये चढत असलेल्या संशयीत माया भोसले या व एक अनोळखी महिले विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts