अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- सध्या जिल्ह्यात घरफोडी करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नुकतीच सेवानिवृत्त शिक्षक त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते.
त्यामुळे त्यांच्या घरी जेवणासाठी गेले असताना पाठीमागे चोरट्यांनी घरी हात साफ केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील तांभेरे येथे राहात असलेले माजी शिक्षक रामनाथ टाके यांच्या सासऱ्याचे निधन झालेल्या घरी जेवणासाठी गेले होते.
त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरात असलेले सात तोळे सोन्याचे दागिने आणि १५०० रुपये लांबवले.
दुपारी जेवण झाल्यानंतर टाके पत्नीसह एक वाजता घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती नातेवाईकांना कळवली, भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.