अहमदनगर दक्षिण

मोटारसायकलवर लिफ्ट देने पडले महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.(Ahmednagar Crime)

तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली.

याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे (रा.निमगाव डाकू)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गायकवाड हे करमाळा येथून धुळ्याकडे मोटारसायकलवरुन जात होते. रस्त्यात एका इसमाला त्यांनी लिफ्ट दिली. माहीजळगाव शिवारात ते दोघे लघूशंका करण्यासाठी थांबले. परंतु या काळात संबंधित इसमाने गायकवाड यांची मोटारसायकल घेवून पोबारा केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts