अहमदनगर दक्षिण

असा पकडला फरार आरोपी कान्हू मोरे… वाचा घटनाक्रम

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यात पत्रकार रोहिदास दातीर यांचा अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार कान्हू मोरे हा न्यायालयीन कोठडीत असताना त्यास कोरोना आजार झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

परंतु त्याला नंतर मुतखडयाचा त्रास होऊ लागल्याने २८ ऑगस्ट रोजी डॉक्टरानी त्यास ससून हॉस्पीटल येथे शिप्ट करणेबाबत सांगितलेने ससून हॉस्पिटल येथे घेवून जाण्यासाठी रुग्णवाहिकेस बोलवून त्यास त्यामध्ये बसण्यासाठी सांगितले असता त्याला लघुशंका आल्याने तो लघुशंकेच्या बहाण्याने तेथून पोलीसांचे कायदेशीर रखवालीतून पळून गेला होता.

या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना स्वतंत्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

त्या आदेशाप्रमाणे अनिल कटके यांनी सपोनि सोमनाथ दिवटे, पोउनि सोपान गोरे, पोहेको भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप पवार, पोना शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, पोको कमलेश पाथरुट, आकाश काळे, प्रशांत राठोड, गौतम लगड यांचे स्वतंत्र पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

आरोपीचा स्वतंत्र पथकामार्फत शोध घेत असतांना पोउनि सोपान गोरे यांना गुप्त बातमी मिळाली की, सदर गुह्यातील फरार आरोपी हा मध्यप्रदेश येथे बडवा जिल्ह्यात आहे. त्यांनतर पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीने सदरचे पथक मध्यप्रदेश येथील बडवा जिल्हयात जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी कान्हु मोरे याचा शोधा घेत असतांना त्यास पोलीस आपला शोध घेत असल्याची चाहूल लागल्याने तो तेथून पसार झाला.

त्यानंतर त्याला मदत व आसारा देत असलेले त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरु मरकड (रा. निवडुगे ता. पाथर्डी)आणि सतिश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी खुर्द ता. राहूरी) यांना तोफखाना पोस्टे येथील नमुद गुन्हयामध्ये भादवी कलम २१२ वाढीव कलम लावून त्यांस अटक केले आहे.

आरोपी मोरे याचा स्थानिक गुन्हे शाखेतील पथक शोध घेत असतांना अनिल कटके यांना गुप्त बातमी मिळाली की, आरोपी मोरे हा राहूरी तालुक्यातील गुहा फाट्याजवळील मळगंगा मंदिर परिसरामध्ये वेशांतर करुन व आपले अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाण बदलून वास्तव्य करीत आहे.

अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुहा फाटा ता. राहूरी येथे जावून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून कान्हु गंगाराम यांस मळगंगा मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याला तोफखाना पो.स्टे. येथे हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही तोफखाना करीत आहेत. सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, व स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts