अहमदनगर दक्षिण

शाळकरी मुलींची गांधीगिरी…रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत प्रशासनाचा केला निषेध

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- कोपरगाव ते पुणतांबा या रस्त्यावर खड्यांची मोठी संख्या निर्माण झाली आहे. या खड्डेमय रस्त्याने शाळकरी मुलं दररोज प्रवास करताना दररोज छोटेमोठे अपघात होत असतात.

अनेक दिवसांपासून वैतागलेल्या शाळकरी मुलींनी पुणतांबा कोपरगाव रस्त्यावर गांधीगिरी आंदोलन केले. या शाळकरी मुलींनी महिला दिनाचे औचित्य साधून रस्त्यातील खड्ड्यांना सडा रांगोळीने सजवून त्या खड्ड्यात वृक्षारोपण करुन स्थानिक प्रशासनाचा निषेध केला.

यावेळी या शाळकरी मुलींना पाठींबा देण्यासाठी तेथील ग्रामस्थही रस्त्यावर उतरुन त्यांनीही या अंदोलनात सहभाग घेतला. एका बाजुला आठ मार्च हा दिवस जागतिक महीला दिन म्हणून साजरा केला जातो.

महिलांच्या मान सन्मानाचे गुणगान गायले जात असताना कोपरगाव तालुक्यातील शाळकरी मुलींना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. हे चिञ अतिशय विरोधाभास दर्शवणारे आहे.

या अनोख्या गांधीगिरी बद्दल शाळकरी मुलींनी आपल्या भावना व्यक्त करीत त्वरीत खड्डेमुक्त रस्ते करण्याची मागणी केली. दरम्यान, रस्त्याच्या कडेला निषेधाचे फलक धरुन रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष शाळकरी मुलींनी वेधले.

संबधीत विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना पुणतांबा कोपरगाव रस्त्याची चाळण झाल्याच्या तक्रारी वारंवार करुनही या जिवघेण्या रस्त्याचे काम करण्यास टाळा टाळ होत असल्याची खंत येथील ग्रामस्थांनी केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts