अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देणार्यास कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरात राहणार्या वंदना अशोक भिंगारदिवे या रविवारी सायंकाळी घरामध्ये स्वयंपाक करत असताना नितीन शेलार त्यांच्या घरात घुसला. तुमचा मुलगा कुठे आहे? असे म्हणत शेलार याने वंदना भिंगारदिवे यांना गावठी कट्टा दाखविला.
वंदना यांच्यासह त्यांचा मुलगा अक्षय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची माहिती अक्षय याने 112 नंबरवर फोन करून पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, राजु शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, संदीप थोरात,
राजेंद्र केकान, राजेंद्र फसले यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत नितीन शेलार याला ताब्यात घेतले. वंदना भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पुढील तपास सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.