अहमदनगर दक्षिण

कर्जत नगर पंचायत गटनेतेपदी ‘यांची’ निवड ! .… आता प्रतीक्षा नगरपंचायतीच्या ‘नगराध्यक्षाची’

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादीच्या पंधरा नगर सेवकांचा एकत्रित गट नोंदणी करण्यात आली असून, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते पदी राष्ट्रवादीचे नगरसेवक संतोष मेहेत्रे यांची तर उप गटनेते सतीश तोरडमल पाटील यांची नियुक्ती केली आहे.

तसे जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वानी पत्र देऊन ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यासाठी नव्याने निवड झालेल्या नगरसेवकांची पहिली बैठक दि.१६ फेब्रुवारी होणार असून,

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या बैठकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांची नियुक्ती केली आहे.

कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी सर्वसाधारण महिलेची वर्षी लागणार असल्याने आ.रोहित पवार कोणाची वर्णी लावतात याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts