अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- पाथर्डी तालुक्यासह शहरात दिवसा होणाऱ्या चोऱ्या तसेच अवैध व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिसांवर सामान्य नागरीकांचा विश्वास उडाला आहे.
महिला व पुरुष आणि पैसा सुरक्षित राहीला नाही. त्यामुळे पोलिसांनी आठ दिवसात तातडीने कारवाई करून या चोऱ्यांचा तपास लावावा असे त्या म्हणाल्या.
याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन देऊन शहर व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी,कायदा सुव्यवस्था,
अवैध धंदे याबाबत माहिती घेऊन पोलिसांना जाब विचारत व कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
त्या म्हणाल्या की, चोरीच्या घटनांनी जनता त्रस्त झाली आहे. ग्रामिण भागात भरदिवसा चोऱ्या होत आहेत. लाखो रुपयाची लुट होते. तपास लागत नाही.
पोलिसांच्या बद्दल सामान्य माणसाच्या मनातला विश्वास डळमळीत झाला आहे. लोकभावना तीव्र आहेत.भरदिवसा महिलांचे दागिने लुटले जात आहेत.
यावर तातडीने उपाययोजना करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजळे यांनी दिला आहे.