अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- होय, आहे आपली दहशत. पण ती विकासाच्या राजकारणाची, महिला, माता- भगिनींच्या संरक्षणाची. विकासाच्या राजकारणावर बोलायचे असेल, तर आपली केव्हाही तयारी आहे.
आरोप-प्रत्यारोप करताना भविष्यात तुम्ही आणखी पातळी खाली घालवली, तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे नैतिकता राखून बोला, अन्यथा पुढील दहा वर्षात जनता काय करू शकते, ते पहा. आपण विधानसभेत जे शब्द दिले तो पाळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
यासाठी थोडा अवधी लागणार आहे. मात्र, तरी आपण काही ठिकाणी तो शब्द पाळला नाही, तर माझे कान पकडण्याचा अधिकार देखील जनतेला आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज दाखल सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, राजेंद्र गुंड, नितीन धांडे, नानासाहेब निकत, बारामती अॅग्रोचे सुभाष गुळवे, अमृत खराडे गुरुजी, अशोक जायभाय आदी उपस्थित होते.
मंगळवारी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपले जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. मागील अनेक वर्षांपासून महिला घराबाहेर पडत नव्हते.
कारण या माणसाची इतकी भीतीयुक्त दहशत होती. आज तीच महिला स्वयंस्फूर्तीने सहज बाहेर पडत आहे. कारण तिला आता मोकळे वातावरण निर्माण केले. मग खरी दहशत कोणाच्या काळात आणि कोणाची होती?
अधिकारी मनमोकळे काम करीत आहे. त्यांना पुरस्कार मिळत आहे. मग कुठे आहे आता दहशत असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी खासदार विखे आणि माजी मंत्री राम शिंदेवर टीकास्त्र सोडले.