अहमदनगर दक्षिण

पारनेर नगरपंचायतमध्ये नवीन राजकीय समीकरणांची नांदी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशूकं अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने व्युव्हरचना आखण्यास सुरुवात केली

असून शहर विकास आघाडीकडून विजयी झालेल्या उमेदवार सुरेखा भालेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीचे नगरपंचायतमध्ये ८ सदस्य झाले आहेत.

पारनेर नगरपंचायतीचे निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेने बरोबर शहर विकास आघाडीने अनेक प्रभागात आपले उमेदवार उतरून निवडणुकीत रंगत वाढवली होती.

पारनेर नगरपंचायतीचे निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली, असे असतांनाच शहर विकास आघाडीचे नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे शहर विकास आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर स्थापनेसाठी जाणार असल्याची चर्चा असून पारनेर मध्ये नवीन राजकीय समीकरणांची नांदी आता पाहायला मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office