जामखेड

महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

अहमदनगर: अकरावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना जामखेड येथे घडली आहे. अश्विनी आण्णा नेमाने (वय १७) असे त्या मुलीचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विनी नेमाने हि शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहे.

आई वडील जामखेड शहरातील एका वीटभट्टीवर कामाला असतात. सकाळी दोघेही कामाला गेले असताना अश्विनी कॉलेजला गेली कॉलेज सुटल्यावर घरी आली घरातील घरकाम केले व नंतर घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

शुक्रवार दि.१२ रोजी सायंकाळी आई वडील घरी आल्यावर ही घटना लक्षात आली तेव्हा तीला ताबडतोब ग्रामीण रुग्णालय दाखल केले. पण तोपर्यंत ती मयत झाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.

जामखेडचे वैद्यकीय अधिकारी शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मिळताच त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन घटना स्थळी घाव घेऊन या घटनेची माहिती घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढिल तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts