अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar news:- एसटी कामगारांचा प्रदीर्घ काळापासून संप सुरू असूनही राज्यातील एकाही पक्षाने त्याची हवी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे जामखेडमधील एसटी कामगारांनी आता आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
आपचे प्रदेश सचिव सचिव धनंजय शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पक्षाचे स्थानिक पदाधिकारी संतोष नवलाखा, तालुकाध्यक्ष बजरंग सरडे यांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळीच एसटी कामगारांनी ‘आप’ मध्ये प्रवेश केला.
त्यामुळे आता राज्यात एसटी कामगारांच्या आणखी एका संघटनेचे भर पडली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कामगारांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रकाश गावडे यांनी सांगितले, राज्यात एसटी कामगारांचे गेल्या पाच महिन्यांपासून राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
कामगारांच्या समस्यांवर एकही राजकीय पक्ष मनापासून सहकार्य करत नाही. आम आदमी पक्षाचे नेतृत्व व धोरण सक्षम आहेत. अशी जाणीव झाली व पुढे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा पक्ष सक्षम आहे.
त्यामुळे सर्व गट तट बाजूला ठेवून अंदोलनातील एसटी कामगारांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. पप्पू घायतडक, आशोक वारे, हनुमंत अंधारे, विष्णू घूले,
दिलीप वारे, शिवदास टेकाळे, विठ्ठल जायभाय, जीवन घायतडक, कल्याण थोरात,किरण भांगे, संजय खोत एसटी कामगार उपस्थित होते.