Karjat News : कर्जत तालुक्यातील शिंदा गावात आमरण साखळी उपोषण सुरू करत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली असून, ग्रामस्थांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालत व जिजाऊ वंदना घेत शनिवार, दि. २८ ऑक्टोपासून साखळी उपोषण सुरू केले.
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या लढ्यात शिंदा, या गावाने मुख्य चौकात विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली. गावात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यास पुढाऱ्यास गाव बंदी करण्यात आली आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंतरवली सराटी येथे मराठा संघर्षयोद्ध मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू राहणार असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिंदा गावातही साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनात सरपंच मधुकर घालमे, मंगेश ढेरे, गणेश पोपट घालमे, संभाजी घालमे सर, चंद्रकांत घालमे, विष्णू घालमे, कैलास घालमे, बालासाहेब घालमे, संपत घालमे, दादा घालमे, प्रल्हाद घालमे, अजीनाथ घालमे महाराज,
ओंकार घालमे, बालाकृष्ण घालमे, रामदास हवालदार, अंबादास हवालदार, दादा वाघमारे, संदीप घालमे, दिपक घालमे, उध्दव भोसले, सतीश घालमे, मोहन घालमे, राम घालमे, हानुमंत राऊत, अशोक भोस, अनिल घालमे,
शुभम मिसाळ आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.