कर्जत

आमदार रोहित पवारांचे हे स्वप्न आणखी लांबणीवर

Ahmednagar News:कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातलगत असलेला करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न आहेत.

मात्र, आता ते आणखी लांबणीवर पडले आहे. राज्यात झालेल्या सत्तातंरानंतर घडलेल्या हालचालींमुळे यामध्ये आता कायदेशीर अडचणी उभ्या झाल्या आहेत.आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ला हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला मुंबईच्या डीआरएटी न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे.

हा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बारामती ॲग्रोकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला विरोध केला.

यासाठी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचेही सहकार्य मिळाल्याचे सांगण्यात येते. या कराराच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तेथे मंगळवारी झालेल्या सुनावणीत संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे. २२ ऑगस्टपर्यंत कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला देऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts