अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यातील 107 गावात सध्या कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसून ही सर्व गावे कोरोना मुक्त झाली आहेत.(corona virus)
आता ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठीक ठिकाणी जनतेचे प्रबोधन सुरु असून आरोग्य विभागाच्या या मोहिमेस लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.लोणकर यांनी सांगितले.
राज्यात काही ठिकाणी ओमायक्रोनचे रुग्ण आढळून येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर शेवगाव पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात 1 लाख 47 हजार 841 नागरिकांना लसीचा पहिला ढोस तर 80 हजार 327 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
तालुक्यातील अमरापूर, दहीगाव शे, गदेवाडी, लाखेफळ, विजयपूर, भगूर आदी 20 गावात 100 टक्के लसीकरण करण्यात आले आहे.
शेवगाव तालुक्यात कोरोनाचे 11 सक्रिय रुग्ण असून त्यात शेवगाव शहर व तळणी येथे प्रत्येकी 3 तसेच लाडजळगाव येथे 2 त्याच बरोबर तालुक्यातील अमरापूर, मुंगी व राणेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.