Ahmednagar News:- पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जर महाराष्ट्रातील लढतींचा विचार केला तर अहमदनगर दक्षिण मधील लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण राज्यामध्ये गाजली व संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेले होते. यामागील प्रमुख कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय प्रस्थ असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील भाजपाच्या तिकिटावर रिंगणात होते तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निलेश लंके निवडणूक रिंगणात होते.
तसे पाहायला गेले तर या ठिकाणाची निवडणूक बघितली तर प्रामुख्याने पवार आणि विखे यांच्यातच होती असे म्हटले गेले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची होती व त्यामुळे प्रचाराचे सगळे मार्ग अवलंबले जात होते.
दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात होता व प्रत्येक दिवस या ठिकाणी तणाव दिसून येत होता. जसा हा तनाव कार्यकर्ते व उमेदवारांवर होता त्यापेक्षा जास्त तो प्रशासनावर होता व त्यातल्या त्यात पोलिसांवर जास्त होता. कारण प्रचार कालावधीमध्ये एकमेकांवर आरोप झाले तसेच बरेच व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.
तेव्हा कोणत्या वेळी त्या ठिकाणी काय होईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येत नव्हती. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.बऱ्याचदा या सगळ्या परिस्थितीत पोलिसांचे व उमेदवारांचे खटके उडताना देखील दिसले. हे जे काही जास्त प्रमाणात पोलिसांचे खटके उडाले असतील तर ते निलेश लंके यांच्यासोबत.
निलेश लंके आणि पोलिसांमध्ये बऱ्याचदा उडाले खटके
या निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार सुरू असताना निलेश लंके यांनी बऱ्याच कारणांमुळे थेट पोलिसांना अंगावर घेतले. याची दोन-तीन उदाहरणे आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिले उदाहरण बघितले तर पैसे वाटपाच्या आरोपावरून जेव्हा कोतवाली पोलिसांनी निलेश लंके यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व त्यासंबंधीचा गुन्ह्याची नोंद केली तेव्हा निलेश लंके नगर शहरातील चौकामध्ये भाषण करत होते व हे भाषण सुरू असतानाच त्यांना ही माहिती मिळाली.
त्यावेळी निलेश लंके यांचा संयम सुटला व त्यांनी भर भाषणामध्ये म्हटले की, त्या पीआयला सांगा की त्यांचा बाप येतोय म्हणून. निलेश लंकेचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता व यावर विरोधी पक्षांनी म्हणजेच खास करून भाजपने खूप टीका केली होती. इतकेच नाही तर या प्रकरणाचा निषेध पोलीस बाईट संघटनेने देखील नोंदवला होता.
तसेच दुसरे उदाहरण घ्यायचे म्हटले म्हणजे शेवगावमध्ये जेव्हा निलेश लंके यांची सभा सुरू होती त्यावेळेस त्यांनी पोलिसांना दम भरला होता व खास करून हा प्रकार शरद पवार यांच्या समोरच घडला होता. हा दम भरण्यामागील प्रमुख कारण असे होते की सभेसाठी जे लोक आलेले होते त्यांना पोलीस अडवत होते
व या सगळ्या प्रकारावरून निलेश लंके पोलिसांवर प्रचंड प्रमाणात भडकले व हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. म्हणजेच दोन्ही पक्षांकडून प्रचाराच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर बऱ्याच ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामे बघायला मिळाले. परंतु या सगळ्या ड्रामांमध्ये निलेश लंके हे खूप चर्चेत राहिले.
…. पण निलेश लंके आता खासदारही झाली आणि शहाणेही
परंतु या चूरशीच्या झालेल्या लढतीत निलेश लंके यांनी विजय मिळवत भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केला व ते खासदार झाले. खासदार झाल्यानंतर मात्र निलेश लंके यांची भाषा काही अंगांनी समंजसपणाची यायला लागली. या मागील जर आपण कारण बघितले तर पूर्ण निवडणूक प्रचारामध्ये पोलिसांना अंगावर घेणारे निलेश लंकेंनी चक्क पोलिसांना सॉरी म्हटले आहे.
त्यामुळे निलेश लंके यांना जनतेने खासदार केले व शहाणे देखील केले असे काही लोकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर त्यांनी बोलताना ‘देने वालो का भी भला, न देने वालो का भी भला’, असं देखील म्हटलं.
म्हणजे निवडणूक प्रचाराच्या कालावधीत प्रचंड आक्रमक दिसून आलेले निलेश लंके खासदार झाल्यानंतर मात्र मवाळ झाले हे आपल्याला दिसून येत आहे. म्हणून निलेश लंके खासदार झाल्यानंतर शहाणे झाले असे म्हणायला वाव आहे.