अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- शाळेत असताना दहावीच्या अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात ‘स्मशानातील सोनं’ असा एक धडा होता. यात खाणीचे काम बंद पडल्याने त्या कामगाराच्या हाताला काम नसल्याने त्याच्या कुटुंबाची उपासमार होत होती.
त्यामुळे तो हाताश होवून असाच एका स्मशानात बसून विचार करत असतो. यावेळी त्याला तेथील जळालेल्या राखेत सोन्याची लहान वस्तू सापडते.
अन् त्या दिवसापासून तो रोज रात्रीच्यावेळी आजूबाजुच गावातील स्मशानभुमीतील मृत व्यक्तीच शोध घेवून सोने शोधत असे.
अगदी असाच गंभीर प्रकार पाथर्डी तालुक्यात सुरू असल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्याचा अंत्यविधी झाल्यावर स्मशानभूमीतून अस्थी/राख पळवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यात विशेष करून महिलांच्या अस्थी पळवल्या जाण्याचे प्रमाण अधिक आहे. चितेची आग विझल्यानंतर काही भागाच्या अस्थी घेऊन पसार होतात.
ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात येऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. त्यानंतर या अस्थी पाण्यात धुवून, गाळून त्यातील वितळलेले सोन्याचे तुकडे काढण्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार करतात.