श्रीगोदें :- तालुक्यातील औटेवाडीजवळ रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चारी नं. १२ येथे स्विफ्ट व हायवाची समोरासमोर टक्कर होऊन दोन जण जागीच ठार झाले.
अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची स्थिती चिंताजनक आहे.
श्रीगोंदे-कर्जत रस्त्यावर असलेल्या लहानशा पुलावर ही दुर्घटना झाली. श्रीगोंद्याहून स्विफ्ट (एमएच १२ जीएफ १२०८) ही कर्जत तालुक्यातील नवसारवाडी येथे जात असताना हायवाची (एमएच १६ एइ ७६१४) समोरासमोर टक्कर झाली.
स्विफ्टमधील महादेव रामदास ननवरे (४६, जलालपूर, ता. कर्जत, जि. नगर) व सुमन रामदास ननवरे (६५) या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. महादेवची सासू व पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.