अहमदनगर दक्षिण

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते होते सुजय विखे यांच्या पाठीशी; तरीही झाला पराभव! परंतु पराभवाचे खापर मात्र…..

Ahmednagar News:- राज्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या काही हाय व्होल्टेज लढती झाल्या त्यामध्ये अहमदनगर दक्षिणची लढत ही प्रामुख्याने खूप महत्त्वाची आणि आकर्षणाची ठरली. यामध्ये भाजप उमेदवार खासदार सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत होती.

झालेल्या या टफ फाईट लढतीमध्ये निलेश लंके यांनी या लढतीत विजय मिळवला व सुजय विखे यांना पराभवाची धूळ चारली. परंतु आता नगर जिल्ह्यातील राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिष्ठेलाच हा धक्का लागला असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

परंतु आता पराभव झाल्यानंतर भाजपच्या गोट्यात मात्र वेगळीच धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये याबाबतीत अंतर्गत खदखद सुरू झाली असून विखे यांची काही यंत्रणा किंवा विखे यांचे काही प्लॅनिंगच या पराभवाला कारणीभूत ठरले असे देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे समोर येत आहे.

 कर्डिलेकोतकरजगताप यांना विखेंनी सोबत घेतल्यामुळे नुकसान झाले?

नगर दक्षिणमध्ये भाजपाचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांचा कोणी गेम केला? याबाबतीत आता भाजपचे कार्यकर्ते आणि विखे यांची यंत्रणा यामध्ये दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरू झाली आहे. सुजय विखे यांचा जो काही पराभव झाला यामागे निष्ठावान भाजपने  विखे यांनी कर्डिले तसेच जगताप व कोतकर यांना बरोबर घेऊन ताकद वाढवण्याचा जो काही प्रयोग केला त्याकडे बोट दाखवायला सुरुवात केलेली दिसून येत आहे.

या पराभवामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि यंत्रणेमध्ये खूप मोठी घुसमट दिसून येत असून ती कधीही बाहेर येऊन कोणाचाही राजकीय बळी घेऊ शकते. निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात ही निवडणूक खूप अटीतटीची झाली व यात निलेश लंके यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीत विजयाकरिता सुजय विखे यांनी अगदी सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेली होती व सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभा घेतली होती. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत व सोबत अनेक आजी-माजी मंत्र्यांनी देखील सुजय विखेंचा प्रचार जोरात केला.

तसेच नगर जिल्ह्यातील भाजप व राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते सुजय विखे यांच्या पाठीशी होते. या बड्या नेत्यांमध्ये जर आपण बघितले तर विधान परिषदेचे आमदार राम शिंदे, श्रीगोंदयाचे आमदार बबनराव पाचपुते तसेच पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे,

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यासारख्या नेत्यांची मोठी फौज सुजय विखे यांच्या पाठीशी होती.

विखे यांची स्वतःची यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणावर ग्राउंड लेव्हलला कार्यरत होती. इतका सारा प्रयत्न करून देखील पहिल्यांदाच खासदारकीच्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या निलेश लंकेने सुजय विखे यांचा पराभव केला. त्यामुळे आता भाजप आणि विखेंच्या यंत्रणेमध्ये अंतर्गत सुरू धुसफूस झाल्याचे चित्र आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts