अहमदनगर दक्षिण

अरे देवा: पुन्हा लालपरीवर दगडफेक ‘या’ तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एसटी वरील हल्ले थांबायला तयार नाहीत. जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा अगाराच्या बसवर काल रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.

या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नसला तरी मात्र कारवाईच्या भीतीपोटी या संपाला विरोध करत अनेक बस चालक व वाहक कामावर हजर झाले आहेत.

काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पाटोदा अगाराची बस (क्र.एम.एच -२०, बी.एल. ३९७२) ही बस पाटोदा या ठिकाणी चालली होती.

दरम्यान जामखेड – सौताडा रोडवर ही बस आली असता अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी या बसवर दगडफेक केली.

यात बसच्या काचेचे नुकसान झाले आहे. या नंतर तातडीने बस चालकाने ही बस जामखेड पोलीस स्टेशनला आणत तक्रार दाखल केली. अज्ञातांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या नंतर ही बस प्रवाशांसह पाटोद्याकडे रवाना झालीे.

या पुर्वी मागिल महीन्यात हरीनारायण आष्टा हद्दीजवळील गांधणवाडी फाटा या ठिकाणी जामखेड अगाराच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली होती.

या नंतर पुन्हा मोहा फाटा येथे दुसऱ्यांदा बसवर दगडफेक झाल्याने हजर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts