Parner News : भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी रविवारी पारनेर तालुक्याच्या विविध भागांत गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करीत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला.
तालुक्यातील पारनेर शहरासह निघोज, पानोली, राळेगणथेरपाळ, जवळे, गुणोरे आदी गावांमध्ये गारपिटीमुळे शेतातील उभी पीके जमीनदोस्त झाली. त्यात शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले.
सोमवारी सकाळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुप्याचे माजी उपसरपंच वत्ता नाना पवार, राळेगणथेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे तालुकध्यक्ष सचिन वराळ,
विशाल पठारे, पप्पू रासकर, गोरख पठारे, जयवीप सालके, सुधीर रासकर, दिलीप मदगे, तान्हाजी सालके, सुधीर रासकर, कैलास शेळके आदींना विविध गावांना भेटी दिल्या. भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यासह सहकाऱ्यांनी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
भेटीप्रसंगी मंडल अधिकारी जयसिंग मापारी, कामगार तलाठी अमोल सरकाळे, तलाठी साठे, कृषी अधिकारी गायकवाड उपस्थित होते. या वेळी बोलताना शिंदे व कोरडे म्हणाले, गारपिकीमुळे शेतीचे माठे नुकसान झाले असून,
यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशी संपर्क करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.