Ahmednagar News : पारनेर सहकारी साखर कारखान्याचा येत्या एक ऑगस्टला ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीच्या देवीभोयरेतील बैठकीत घेण्यात आला आहे.
साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजूने लागल्याने बचाव समितीची बैठक देवीभोयरेत संपन्न झाली. कारखान्याविषयी विविध याचिकांच्या उर्वरित खटल्यांविषयी चर्चा करण्यात आली.
पारनेर साखर कारखाना बळकावणाऱ्या क्रांती शुगरला, या वेळी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. येत्या पंधरा दिवसांत कारखान्याची अतिक्रमीत दहा हेक्टर जमीन खाली करावी,
या जागेवरील मुद्देमाल त्वरित हटवावा, त्यापूर्वी क्रांती शुगर यांनी कारखान्याच्या आठ वर्षे वापरलेल्या जागेचा मोबदला व गेल्या आठ वर्षांपासून क्रांती शुगर पारनेर यांनी पारनेर कारखान्याचा औद्योगिक परवाना वापरल्याचा मोबदला नोटीसद्वारे मागण्यात आला आहे.
क्रांती शुगर यांनी नोटीस स्वीकारण्याला नकार दिल्याने नोटीस कार्यालयाबाहेर चिटकवण्यात आली आहे. पंधरा दिवसांत ४० कोटी रुपयांचा पारनेर कारखान्याच्या वापरलेल्या मालमत्तेचा मोबदला न दिल्यास त्यापोटी कारखान्याची संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा नोटिसीव्दारे देण्यात आला आहे.
येत्या १ ऑगस्टला शंभर टॅक्टर व हजारो सभासद, शेतकरी कारखान्यावर ताबा मोर्चा काढणार आहेत. यामध्ये सर्व शेतकरी, सभासद व कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराला बेकायदा ठरवून कारखान्याच्या वीस हजार सभासदांना न्याय दिल्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या वेळी घेण्यात आला. पारनेर साखर कारखान्याच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे नुकताच सादर करण्यात आला असून,
त्यावर लवकरच निर्णय होवून अवसायनातील या संस्थेचे पुनर्जीवन होत आहे. यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे समितीचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी सांगितले. या वेळी संतोष वाडेकर, अशोक आंधळे, संभाजीराव सालके, शंकर गुंड, नवनाथ तनपुरे, सुनिल चौधरी, कृष्णाजी बडवे, खंडू भुकन, कांता लंके, बाळासाहेब कवाद, सतीश रासकर, सागर गुंड, दत्ता पवार, दत्ता भूकन, शंकर तांबे, विठ्ठल कवाद, मंगेश वराळ, गंगाधर सालके, गोविंद बडवे, बाबाजी गाडीलकर
सरपंचाची अरेरावी
देवीभोयरेतील मंदिर सभागृहात बचाव समितीचे कार्यकर्ते जमताच तेथील सरपंच विठ्ठल सरडे यांनी मंदिर सभागृहात बैठक घेण्यास मज्जाव करून मंदिर कर्मचाऱ्याला पाठवून अरेरावी केली. या वेळी समितीने मंदिरातच बैठक घेतली व सरपंचाच्या भूमिकेचा निषेध केला.