शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर २०२३ मध्ये ४३ कोटी ६२ लाख रुपये किंमतीच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. या कामामध्ये राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचा समावेश या मंजूर कामामध्ये सामावेश असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
याबाबत आमदार राजळे यांच्याकडून तसे पत्र प्रसिध्दीस देण्यात आल आहे. या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांना एवढ्या मोठया प्रमाणात निधी दिल्यामुळे आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.
शेवगाव शहर बाह्यवळण रस्त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिकाभ्यांसमवेत बैठक घेवुन कामाचे सर्वेक्षण भूसंपापदन प्रस्ताव तयार करणे,
तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच शेवगांव बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.