Indurikar Maharaj : प्रत्येक माणूस संपत्तीच्या मागे धावू लागला आहे. माणसाला पैसा संपत्तीचा मोह आवरत नाही, परंतु जीवनामध्ये पैसा, संपत्ती कामाला येत नाही तर माणुसकी कामाला येते.
त्यामुळे पैशावर नव्हे तर माणसावर प्रेम करा असे मत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील एका काल्याच्या कीर्तनात जनसमुदायाला मार्गदर्शन करताना इंदुरीकर महाराज म्हणाले, मोबाईलमुळे आपापसातील संवाद कमी झाला असून समाज माणुसकी विसरत चालला आहे.
तरुणवर्ग दिशाहीन होऊ लागला आहे त्यामुळे चांगले संस्कार घडवण्यासाठी व चांगले जीवन जगण्यासाठी परमार्थाचा शिवाय पर्याय नाही. संत महंतांच्या विचाराने जीवनाचे सार्थक होते.
दारूचे व्यसन दिवसेंदिवस वाढले असून महिलांनी पुढे येऊन दारूबंदीला आळा घालण्याची गरज आहे. जीवनामध्ये पैसा संपत्ती नव्हे तर आपण केलेले सत्कर्म कामाला येतात.
त्यामुळे जीवनामध्ये पैसा संपत्ती कामाला येत नाही तर माणुसकी कामाला येते. त्यासाठी माणुसकी जपा. असा संदेश त्यांनी दिला.