पाथर्डी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून आनंदाच्या शिधासाठीची जी काही रक्कम होती ती ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यावर घेऊन ती पुरवठा खात्यात जमा न करता परस्पर तिचा गैरवापर केल्याप्रकरणी काकासाहेब सानप नावाच्या व्यक्तीचा जामीन अर्ज अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शेख यांनी फेटाळून लावला आहे.
पुरवठा शाखेकडून गौरी गणपती तसेच दिवाळी व गुढीपाडव्यानिमित्त आलेल्या आनंदात शिधा संबंधीच्या त्या रकमा होत्या व याबाबत हा अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
50 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदारांकडून आनंदाच्या शिधासाठीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या खात्यावर घेऊन ती पुरवठा खात्यात जमा न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शेख यांनी फेटाळून लावला आहे.याबाबतची माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील अनेक स्वस्तधान्य दुकानदारांकडून आनंदाचा शिधा,
या गौरी गणपती, दिवाळी व गुढीपाडव्यानिमित्त आलेल्या संचाच्या रकमा पुरवठा विभागात तहसीलदार यांच्या अंतर्गत कार्यरत असणारा खाजगी व्यक्ती काकासाहेब महादेव सानप याच्या गुगल पे व फोन पे अकाउंटवर तालुक्यातील अनेक स्वस्तधान्य दुकानदारांनी रकमा खात्यावर पुरवठा शाखेत भरल्या नाहीत. दरम्यान, पुरवठा शाखेकडून सदरील रकमेची मागणी स्वस्तधान्य दुकानदारांना पत्र व्यवहार करून करण्यात आल्यानंतर स्वस्तधान्य दुकानदारांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या,
त्यानंतर अंबिकानगर, ता. पाथर्डी, येथील स्वस्तधान्य दुकानदार अर्जुन मारुती शिरसाट, या माजी सैनिकाने त्यांच्या रकमेबाबत पुरावे देऊन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे सदरील काकासाहेब महादेव सानप याच्याविरुद्ध फिर्याद दिलेली होती. सदरच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे सदरील काकासाहेब सानप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरच्या फिर्यादीमध्ये सदरील आरोपीने सर्व स्वस्तधान्य दुकानदारांकडून अंदाजे ५० लाखापेक्षा अधिक रक्कम गोळा केली असण्याची केली होती. दरम्यान, सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर काकासाहेब सानप याने अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रस्तुत प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
सदरच्या अर्जावर मूळ फिर्यादी अर्जुन मारुती शिरसाठ यांच्या वतीने अॅड. गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला. सदरील प्रकरणाचे गांभीर्य व व्याप्ती तसे सदरील गुन्ह्याची उकल होण्यासाठी काकासाहेब सानप यांच्या अटकेची बा गरजेची असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काकासाहेब सानप याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यांनी पारित केला. मूळ फिर्यादी मारुती शिरसाठ यांच्यावतीने अॅड. गोरक्ष पालवे यांनी