शेवगाव,ता.१२: शेवगाव सारख्या ग्रामिण भागात महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता असे उपक्रम आवश्यक आहेत. स्वत:चा प्रभाग आदर्श करुन शहराचे नेतृत्व करण्याचे देखील नगरसेवक सागर फडके यांच्यात क्षमता असल्याचे या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून स्पष्ट होते.
असे प्रतिपादन अभिनेत्री हिंदवी पाटील यांनी केले. शेवगाव येथे जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुप यांच्या संयुक्त विदयमाने कोजागिरी पौर्णिमेनिमत्त महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवातील नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या.
यावेळी अभिनेत्री हिंदवी पाटील, माजी ग्रा. सदस्या सुनिता फडके, जगदंबा महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता फडके, रुपाली फडके, नम्रता गवारे,राजश्री रसाळ, वसुधा सावरकर, डॉ. मनिषा लड्डा, अश्विनी गवळी, मंजुश्री धुत, किरण बिहाणी आदी प्रमुख उपस्थित होत्या.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, मुली व महिलांच्या कलागुणांना ग्रामिण भागात व्यासपिठ मिळत नाही. त्यामुळे अनेक कर्तृत्वान महिला व मुलींना संधी अभावी स्वत:तील कला, गुण जोपासता येत नाहीत. त्यासाठी गावोगावी अशा महिला महोत्सवाची गरज आहे.
यावेळी ५ वी ते ८ वी गट प्रथम चंचल गारोळे, व्दितीय प्रिंजल छेडा, तृतीय – समृध्दी खंडागळे व मनस्वी राठी, उत्तेजनार्थ चार्वी बाफना, सानवी लबडे, श्रध्दा खेंदके, ९ वी ते १२ वी गट – प्रथम – दिव्या काळे, व्दितीय – अनु कुदाळे, तृतीय – खुशी चव्हाण व निलाक्षी धनवडे, उत्तेजनार्थ – शुभांगी पवार, सिध्दी जयस्वाल,
अनुष्का जाधव, समुह नृत्य प्रथम – नेहा प्रजापती व श्रावणी ढाकणे, व्दितीय – तनुजा व ऋतुजा ढाकणे, तृतीय – श्रध्दा नरके व वैष्णवी शिंदे व नारीशक्ती ग्रुप वरुर, मायलेकी ग्रुप – प्रथम – योगिता व संस्कृती काशिद,
व्दितीय – सिमा व सोनल गवते, तृतीय – प्रांजल, अक्षरा व रत्ना बैरागी आदी विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पोरितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. परिक्षक म्हणून जालिंदर शिंदे व हेमलता पाटील यांनी काम पाहीले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थितांमधील लकी ड्राँच्या भाग्यवान महिला विजेत्यांना पैठणी व नथ भेट दिली.
निवेदक उद्धव काळापहाड यांनी काही खेळ घेऊन महिलांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक सागर फडके यांनी तर सुत्रसंचालन उध्दव काळापहाड व दिपक कुसळकर यांनी केले. तर सुजाता फडके यांनी आभार मानले.