विकासाच्या दृष्टीने आपल्या ग्रामीण भागात कोण लक्ष देतो, विकासाचे कामे करतो हे पाहून त्यांच्या मागे उभा राहिले पाहिजे. निवडणूक आली की समोरील उमेदवारांना जातपात आठवते. विकासाचे मुद्दे सोडून, वेगळ्या वळणावर निवडणुक नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
विरोधक गावात येतील रडतील-पडतील, चुकीचे आश्वासने देतील, त्यांच्या भावनिक बोलण्याला बळी पडू नका. आपल्याला विकासाच्या बाजूने जायचे आहे. पूर्वी विरोधकांना सत्ता देऊन पाहिली.
त्यांनी काय केले हे आपण सर्वांनी पाहिले आहे. लोकनेत्या पंकजा मुंढे यांच्या माध्यमातून व महायुतीच्या सरकारच्या काळात आमदार मोनिका राजळे यांनी मोठ्या प्रमाणात भरीव विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे पंकजा मुंढे यांना मंत्री करण्यासाठी, मोनिका राजळेंना मोठे मताधिक्य टाकळीमानुर व भालगाव गटातून द्यावे असे आवाहन भाजपचे युवानेते धनंजय बडे यांनी केले आहे
तालुक्यातील चिचंपुर पांगुळ येथे महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचाराच्या संवाद दौऱ्यावेळी बडे बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव फुंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, खरेदी विक्री संघाचे संचालक भगवानराव आव्हाड,आजीनाथ पाराजी बडे,
भिमराव बडे, प्रभू बडे, सूर्यभान बडे, अर्जुन बडे, विष्णू बडे, रावसाहेब बडे, बबन बडे, आजीनाथ शिवराम बडे, आश्रुबा बडे,शिवनाथ खेडकर, आजीनाथ सीताराम बडे, रामदास आंधळे, सतीश शिरसाट, अंकुशराव कासुळे, उमेश खेडकर, बाळासाहेब अकोलकर, भिमराव पालवे, बळीराम काकडे, दिनू भवार, वासुदेव खेडकर, श्रीकांत खेडकर, नंदू वारुंगळे, प्रदीप अंदुरे यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना मोनिका राजळे म्हणाल्या, दहा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना प्रत्येकाशी संपर्क जोडला. पुर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व स्व. दगडु पाटील बडे यांनी केले. या भागात आल्यावर त्यांची आठवण येते. स्व. गोपिनाथराव मुंढे साहेब व पंकजाताई मुंढे यांच्यावर मोठा विश्वास या तालुक्यातील लोकांचा आहे.
त्यामुळे त्यांचे प्रेम या भागावर परळीपेक्षा जास्त राहीले आहे. याच प्रेमातून पंकजा मुंढे यांनी ग्रामविकासमंत्री असताना विविध योजनाच्या माध्यमातून, विशेषतः २५१५ सारख्या योजनेचा मोठा निधी दिल्याने विकासाची कामे मार्गी लागली. निवडणूक आली की समोरचे उमेदवार येतात, जातीपातीचे, दबावाचे राजकारण करतात.
शेवगावच्या मंडळीला दहा वर्षानंतर तालुक्याची आठवण आली. इतकी वर्षे ते कधी इकडे फिरकले देखील नाहीत.आता निवडणुक विकासाचा मुद्दा सोडून, निवडणुक वेगळ्या मुद्यावर भरकटवण्याचे काम सुरु आहे. साडेचार पावणेपाच वर्षे सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतो.
निवडणुका आल्या की मग जातीचे नाव पुढे केले जाते. सामान्य माणसाला जातीवाद कधीही परवडत नाही, असे राजळे म्हणाल्या.शुक्रवारी राजळे यांनी, पाथर्डी तालुक्यातील करोडी चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, पिंपळगाव टप्पा, चिंचपुर पांगुळ, मानेवाडी, जोगेवाडी,
वडगाव, ढाकणवाडी, अंबिकानगर, चुंभाळी, टाकळीमानुर, तिनखडी, भिलवडे आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गावागावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच अनेक युवक मोटार सायकल रॅलीतून संवाद दौऱ्यात सहभागी झाले.