अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघातील वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण ८०.३२ किमीच्या एकूण २५ रस्त्यांच्या कामासाठी ५३ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
ग्रामीण भागातील या प्रलंबित रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी नागरिकांची मागणी होत होती. या मागणीनुसार खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री राम शिंदे व आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निधीसाठी वारंवार पाठपुरावा केला.
या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास विभागामार्फत जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी मंजूर झाल्याचा शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नागरिकांमधून समाधान व्यक्त
अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधीची तरतूद केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आहे. खासदार गांधी, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांचे अभिनंदन केले आहे.