Rahuri News : १५ दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यात मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविलेल्या १८ बालकांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील २५ बालके व मुलांना शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले.
आमदार तनपुरे यांच्या वतीने राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील १८ वर्षांखालील बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. त्यात समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे व योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने शस्त्रक्रिया करू शकले नाही,
अशा २५ बालकांना मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. ज्या बालकांना, लहान मुलांना शस्त्रक्रिया सांगितली होती, अशा रुग्णांना रविवारी रात्री आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलविण्यात आले.
त्याप्रमाणे रुग्ण व त्यांचे आई-वडील नातेवाईक यांना आमदार तनपुरे यांच्या वतीने शहराध्यक्ष संतोष आघाव व पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव यांनी सूचना दिल्या.
या सर्व रुग्णांवर मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या सर्व रुग्ण व नातेवाईक यांची जेवणाची, राहण्याची मोफत व्यवस्था आमदार तनपुरे व सोनालीताई तनपुरे यांनी केली आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, अशोक आहेर, बाळासाहेब उंडे, पांडुरंग उदावंत, किशोर पातोरे, भारत विटनोर, भारत बाचकर, संदिप सोनवणे, जनसंपर्क कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.