अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- तरूणीच्या घरात घुसून मोबाईल नंबर मागितला. तसेच तिच्या अंगाला झटून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडलीय.( Ahmednagar crime)
या प्रकरणी नितीन अडागळे याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील २३ वर्षीय तरूणी ही दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजे दरम्यान तिच्या घरातील झोपण्याच्या खोलीत होती. यावेळी आरोपी नितीन अडागळे हा अनाधिकृतपणे त्या तरूणीच्या घरात घुसला.
त्याने त्या तरूणीला मोबाईल नंबरची मागणी केली. तसेच तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगाला हात लावून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला.
सदर तरूणीने ताबडतोब राहुरी पोलिस ठाणे गाठले. तिने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नितीन शहाजी अडागळे राहणार राहुरी खुर्द ता. राहुरी. याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.