अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार आहे.
रेखा जरे यांच्या हत्येला एक वर्ष उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील आरोपी बोठे याने नगर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
येथील न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर त्याने जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. या अर्जावर गुरूवारी सुनावणी होती. आता 15 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.