अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात यंदाचं वर्षात चांगला पाऊस झाला. यामुळे पाण्याची पातळी देखील चांगली वाढली होती.
दरम्यान यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाप्रश्न देखील मार्गी लागतो. यातच आता राहुरी तालुक्यातून एक महत्वाची मागणी समोर येऊ लागली आहे.
भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी अनिल शिरसाठ यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे चिंचोली येथील जनता दरबारात केली.
यावेळी येत्या दोन-तीन दिवसांत भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री तनपुरे यांनी दिले आहे.
ना. तनपुरे यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता नान्नोर यांना सूचना करून पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून येत्या दोन-तीन दिवसांत भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल शिरसाठ यांनी सांगितले.