शेवगाव

शेतकऱ्याना मदत नाहीच, सरकार कडून फक्त घोषणाबाजी

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने, भातकुडगाव परिसरात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावानुसार शासनाने निधी मंजूर केला नाही, त्यामुळे शेतकरी मदतीची फक्त घोषणा केली.

मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. मागील हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड पाऊस झाला होता. त्यावेळी खरीप हंगामातील उत्पादन प्रचंड घटले होते.

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचाही पिकांना फटका बसला होता. खरीप हंगामातील नुकसान रब्बी हंगामात काढण्यासाठी शेतकरी कामाला लागला होता. मात्र, मार्च महिन्यात मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे गहू, कांदा,

रब्बी हंगामातील अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तातडीने पंचनामे करून शासनास प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते.

त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, यांनी पंचनामे करून शासनास प्रस्ताव पाठविला आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

मात्र, जून महिना संपला असला तरी अद्याप या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी मदतीची आस लावून बसले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts