अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- भरदिवसा दुपारी राहुरी फॅक्टरी येथील भरवस्तीतील बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 58 हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.(Rahuri Factory)
कुचकामी पोलीस यंत्रणेमुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यात चोरटे दहशत पसरवित आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथे काल मंगळवारी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 58 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
देवळाली बंगला येथील वरखडे-वाणी रस्त्यावर (इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर) अशोक खराबे यांचे घर आहे. अशोक खराबे व त्यांचा मुलगा हर्षल हे ड्युटीवर गेले होते.
तर अशोक खराबे यांच्या पत्नी व सूनबाई या आपल्या घराला कुलूप लावून देवळाली प्रवरा येथे नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.
याचवेळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 1 लाख 58 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.
याचवेळी खराबे यांच्या सूनबाई आपल्या नातेवाईकांसोबत घराजवळ आल्या असता ते अज्ञात चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.दरम्यान राहुरी तालुक्यात चोर्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाबद्दल सामान्य नागरिकांतून चीड व्यक्त होत आहे.