अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- तुम्ही विश्वासाने जो खासदार निवडून दिला तो कोणाकडून ही टक्केवारी घेत नाही. त्यामुळेच नगर जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाला यापूर्वी कधीही नव्हती एवढी गती सध्या आहे.
अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. तसेच हा रस्ता कर्जत तालुक्यातील पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे त्या कामात कुणीही अडथळा आणण्याचे काम करू नका. असेही खा.विखे यांनी यावेळी सांगितले.
कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या नगर सोलापूर या महामार्गाच्या कामाची पाहणी करत भूसंपादनाच्या कामात लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांसह आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते की आज पर्यंत अनेक बैठका या अगोदरही घेतल्या आहेत.
शेतकऱ्यांनी आगामी एका महिन्यात आपले वाद मिटवून प्रांताधिकारी यांचे कडून पैसे घेऊन जावेत. अन्यथा त्या नंतर कोणतीही बैठक घेतली जाणार नाही ज्याचे पैसे राहिले आहेत त्याचे पैसे कोर्टात जमा केले जातील.
सदर रस्त्यासाठी भूसंपदीत केलेली जमीन शासनाची झालेली असून कोणीही यात अडथळा आणू नये सदर रस्त्यावर जे मंदिर वा दर्गा येत आहेत
त्याचे सदरच्या ग्राम पंचायतीनी योग्य जागेवर स्थलांतर करावे यासाठी निम्मे पैसे मी देतो निम्मे पैसे ग्रामपंचायतीने लोक वर्गणीतुन भरावेत. आपण अत्यंत श्रद्धेने सदर मंदिराचे दर्ग्याचे स्थलांतर पार पाडू असे आवाहन खा डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.