अहमदनगर बातम्या

ऐतिहासिक क्षण : नगरमधून आज धावणार पहिली ‘शिवाई’…!

Ahmednagar To Pune Electric Bus :- ज्या अहमदनगर शहरातून राज्याची प्रवासी सेवालाल परीने सुरू केली, त्याच शहरातील तारकपूर बसस्थानकात ७५ वर्षात पदार्पण करीत असताना आता शिवाई बसचे प्रस्थान होत आहे.

एसटीच्या इतिहासातील स्थापनेचा साक्षीदार असणारे शहर ही अहमदनगर शहराची ओळख आहे. आता शिवाईच्या प्रस्थानाच्या रूपाने राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या संकल्प व परिवर्तनाच्या वाटचालीचे साक्षीदार देखील नगर शहर होणार आहे.

प्रवाशांच्या सेवेचे ब्रीदवाक्य घेऊन धावणार्‍या लालपरीच्या कार्यकाळास बुधवार दि. एक जून रोजी ७४ वर्षे पूर्ण होत असून जनसामान्यांची एसटी ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

ज्या अहमदनगर शहरातून एसटीची प्रवासी सेवा सुरू झाली, तेथूनच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई बसचे प्रस्थान होणार आहे.

हा कार्यक्रम एक जून रोजी सकाळी तारकपूर बसस्थानकात साडेआठ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी दिली.

पहिल्या एसटी बसचे वाहक असलेले लक्ष्मणराव केवटे या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळी साडेनऊ वाजता तारकपूर आगारातून शिवाई ई-बस एसटी महामंडळाच्या एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्याच हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ हाेणार आहे.

तर पुणे येथून शिवाई ई-बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हाेणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts