अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणे हा मुद्दा अनेक दिवसांपासून भिजत घोंगडे आहे. अनेक निवडणूक झाल्या पण हा विभाजनाचा मुद्दा मात्र काही सुटला नाही. जिल्हा मोठा असल्याने प्रशासकीय दृष्ट्या अनेक गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे हे विभाजन व्हावे व दोन जिल्ह्याची निर्मिती व्हावी अशी एक मागणी आहे.
त्यामुळे नगर व श्रीरामपूर किंवा शिर्डी असे दोन जिल्हे होतील असे म्हटले जात आहे. परंतु श्रीरामपूरकरांनी येथेच जिल्ह्याचं ठिकाण व्हावे यासाठी जोर धरलेला आहे. दरम्यान आता जिल्ह्याचे विभाजन हे दोन नव्हे तर चार विभागात होईल अशी एक चर्चा आहे.
कोणते चार विभाग होऊ शकतात?
यामध्ये साधारण शिर्डी, श्रीरामपूर, संगमेनर, नगर असे चार भाग होऊ शकतात अशी एक चर्चा आहे. जर या प्रमाणे कार्यवाही झाली तर अहमदनगर जिल्ह्याचे चार भागात विभाग होतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे व्यवस्थित मार्गी लागतील असे म्हटले जात आहे. दरम्यान ही एक चर्चा आहे. या चर्चेची पुष्टी मात्र कुणी केलेली नाही. तसेच याला अधिकृत दुजोरा देखील नाही.
विभाजन कशासाठी?
अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार अगदी मोठा आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाचा बोजा एकाच ठिकाणी येतो. तसेच जे दूरची गावे आहेत त्यांना आपली शासकायय कामे करून घेण्यासाठी नगरमध्ये यावे लागते. यासाठी त्यांना प्रवासही जास्त करावा लागतो व वेळही खूप जातो. ही सगळी कामे सोपी व्हावीत यासाठी हे विभाजनाचा मुद्दा महत्वाचा मनाला जातो. जर दोन भागात विभाजन झाले तर प्रशाकीय कामे सोपी होतील यात शंका नाही.