अहमदनगर बातम्या

अहमदनगरच्या ‘चंद्रशेखरने’ रेशीम शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न ! तुम्हीही करा, शासन देतेय ४ लाखांचे अनुदान

आजचा तरुण नोकरीच्या मागे धावताना दिसतो. तसेच शेती करावी तर निसर्गाचा लहरीपणा आडवा येतो त्यामुळे शेतीही परवडत नाही अशी ओरड तरुण करतो. त्यामुळे सध्या अनेक सुशिक्षित तरुण रेशीम शेतीकडे वळले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेला चंद्रशेखर काळे. याने रेशीम शेतीतून खूप मोठे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे शासन याला चार लाखांचे अनुदान देत आहे.

निसार्गाच्या लहरीपणात रेशीम उद्योग आधार

बदलते हवामान, निसार्गाचा लहरीपणा यामुळे शेतीकडे सध्या तरुण पाठ फिरवत आहे. आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आजच्या तरुणाने रेशीम उद्योगकडे वळणे गरजेचे आहे. शासन देखील यासाठी अनुदान देत आहे. कीटक संगोपनगृहासाठीही अनुदानाची तरतूद आहे. शेती, भुसार माल, दुग्ध व्यवसाय याला एक चांगला पर्याय म्हणून रेशीम उद्योग पर्याय ठरेल. रेशीम शेती करण्यासाठी लागणारे साहित्यासाठी ३२ हजार रुपये अनुदान आहे.

किती व कसे अनुदान मिळेल?

शेतकरी अनुदानास पात्रते बाबत तुती लागवडीसाठी कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त पाच एकर प्रतिलाभार्थी क्षेत्र मर्यादा निश्चित केली आहे. एक एकर तुती लागवड, संवर्धन व कोष उत्पादनासाठी २ लाख १८ हजार १८६ रुपये अनुदान मिळते. तसेच मजुरीसाठी देखील अनुदान मिळते. यामध्ये तुती लागवड, जोपासना, संवर्धन व कीटक संगोपन करण्यासाठी ६८२ मनुष्य दिवस तसेच कीटक संगोपनगृह बांधकामासाठी २१३ मनुष्य दिवस असे गृहीत धरून मजुरी दर २७३ रुपये असा धरून अकुशलसाठी २ लाख ४४ हजार ३३५ रुपये अनुदान लाभार्थ्यांना मिळेल.

रेशीम कीटक संगोपनगृहासाठी शेड लागते. ५० बाय २२ फुटांचे शेड तुम्हाला उभे करायचे असेल तर १ लाख ७९ हजार १४९ रुपये अनुदान शासनाकडून मिळते. अनुदान योग्य प्रमाणात असल्याने तरुणांना मोठी आर्थिक मदत मिळेल. व्यवसाय वाढीसाठी आर्थिक आधार मिळेल.

राज्यात महारेशीम अभियान

रेशीम संचालनालयाचे संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी माहिती दिली की, रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आगामी वर्षात तुती लागवड करण्यासाठी इच्छुकांची नाव नोंदणी करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी २० नोव्हेंबरपासून राज्यात महारेशीम अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. यात आगामी वर्षात तुती लागवड करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी नावनोंदणी करायची आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: silk farming

Recent Posts