Ahmednagar News : सध्या प्रत्येकजणाची एकच ओरड असते की, शेती परवडत नाही. मात्र शेती परवडत नाही. म्हणणाऱ्यांपुढे नगरच्या तरुणाने आदर्श उभा केला आहे. जवळपास २५ वर्षे नोकरी केली,दरम्यान या काळात पगार देखील चांगला गटात मिळत होता. मात्र गावाची ओढ शांत बसू देत नव्हती, त्यामुळे नोकरीत मन लागत नव्हते.
शेवटी नोकरी सोडून त्याने गावाची वाट धरली. गावी येऊन शेती करण्यास सुरूवात केली. याकाळात अनेक अडचणींवर मत करत खडकाळ माळरानावरील अडीच एकर क्षेत्रात सिमला मिरची फुलवली. अन या मिरची विक्रीतून तब्बल १५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. गहिनीनाथ भिमाजी आगलावे गुंजाळवाडी पठार (ता.संगमनेर) असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्जुले पठार गावांतर्गत असलेल्या गुंजाळवाडी हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असतो,मात्र गहिनीनाथ आगलावे यांनी नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळख असल्याचा या भागाचा शिक्का पुसला आहे. पावसावरच येथील शेतकर्यांची शेती अवलंबून आहे, अशा कठीण परिस्थितीतही या भागातील शेतकरी उत्तम शेती करत आहेत.
अशाच पद्धतीने आगलावे यांनी नोकरी सोडून शेती करण्याचे ठरवले. खडकाळ माळरान असल्याने पाणी कोठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. हळूहळू बोअरवेल घेतले. त्यानंतर पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आणि बोअरवेलचे पाणी त्यामध्ये सोडले. त्या माध्यमातून शेती करण्यास सुरूवात केली. टोमॅटो, कांदा या पिकांसह आदी पिके घेण्यास सुरुवात केली. अनेकदा झालेला खर्चही अंगलट आला. पण तरी ते डगमगून गेले नाही. हळूहळ ते शेतीत रमून गेल्याने विविध पिके घेण्यास सुरूवात केली.
२० एप्रिल रोजी त्यांनी अडीच एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर सिमला मिरचीच्या रोपांची लागवड केली होती. त्यानंतर १० जूनला मिरची सुरू झाली. सरासरी प्रतिकिलोस पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. ही सर्व मिरची पॅकिंग करून सुरतला पाठवत आहे. आत्तापर्यंत पाच तोडे झाले असून एकूण तीस टन माल गेला असल्याने १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पाण्याची कमतरता असताना देखील ठिबकच्या माध्यमातून सिमला मिरचीला पाणी देत आहे. आगलावे हे वर्षभरात जवळपास दोन ते तीन पिके घेत आहे. योग्य नियोजन केल्यानेच आज हे सर्व शक्य झाले आहे. आत्तापर्यंत पाच तोडे झाले आहेत. आणखी काही तोडे होणे बाकी आहे. बाजारभाव चांगले असल्याने आणखी सिमला मिरचीचे पैसे होणार असल्याचे गहिनीनाथ आगलावे यांनी सांगितले.