Ahmednagar News : नेवासे – शेवगाव राज्य मार्गावरील व्यंकटेश ज्वेलर्ससमोर ऊस वाहतूक करणारा डबल ट्रेलरचा ट्रॅक्टर स्कार्पिओ स्कुटी अशा तीन वाहनांच्या अपघात झाला होता.
ह्या अपघातात स्कुटीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३) रा. नजीक चिंचोली, ता. नेवासे हा युवक गेल्या रविवारी रात्री जागीच ठार झाल्याप्रकरणी पोलिसांनी आता एक काळ्या रंगाची स्करपिओ वाहन ताब्यात घेतले.
ही दोन्ही वाहने पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहेत. त्यांचे वय ३३ वर्ष होते. ते पोल्ट्री व्यावसायिक होते. मृत अमित हे नेवासे न्यायालयातील प्रसिद्ध वकील अॅड. कॉम्रेड बन्सी सातपुते व सामाजिक कार्यकर्त्यां कॉ. स्मिता पानसरे यांचा एकुलता मुलगा होता. तर ज्येष्ठ विचारवंत दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे नातू होते.