अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! जादुटोणा करत महिलेवर…

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत|पहिल्यांदाच जादुटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याच घटनेतील आरोपींविरुद्ध अत्याचाराचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी सापळा लावून अवघ्या काही तासांतच मध्यरात्री या आरोपीच्या मुसक्या आवळल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावच्या शिवारात उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरुन एक कुटुंब आले आहे. येथे हे कुटुंब दुसऱ्याची शेती वाट्याने करुन प्रपंच चालवत होते. परंतू या कुटुंबाला मागील काही दिवसांपासून अनेक घरगुती अडचणींचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे नातेवाईकाच्या माध्यमातून ओळख झालेल्या शिवाजी पांडे (रा. शिरापूर, ता. संगमनेर) याने या कुटुंबाला होम हवन करुन तुमची अडचणीतून सुटका करुन देतो, असे सांगितले. त्यामुळे या भोंदू बाबांबरोबर या कुटुंबाची ओळख वाढली होती.

याच ओळखीचा फायदा घेत भोंदू बाबा शिवाजी पांडे हा सोमवार दि. ३१ जुलै रोजी त्यांच्या आला होता. यावेळी घरातील महिलेचा पती हा कामानिमित्त शेतात गेल्याचा फायदा घेऊन या भोंदू बाबाने घरात एकट्या असलेल्या महिलेच्या अंगावर उदीय पदार्थ टाकून या महिलेच्या मनाविरुद्ध अत्याचार केला होता.

याबाबत या पिडीत महिलेने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नुसार भादवि कलम ३७६ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समुळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ कलम ३ (१), (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी तात्काळ हवालदार बाबासाहेब पाटोळे, पोलीस नाईक विनोद गभिरे, ढोकणे, पथवे व वाघ यांना योग्य त्या सुचना देऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले होते.

यावेळी मोठ्या शिताफीने पोलीस पथकाने शिरापूर येथे मध्यरात्री ३ वाजता सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. दरम्यान मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts