शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगांव येथे आण्णासाहेब साठे यांची १०४ वी जयंती सोमवार दि ५ आॅगस्ट रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोकूळभाऊ दौंड होते.
यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी ठाकूर निमगांव चे मा सरपंच रघुनाथ घोरपडे, विशाल घोरपडे, लहुजी ग्रुप चे नामदेव घोरपडे, संतोष पवार, अमर ढाकणे, प्रवीण ढाकणे, पप्पू झिरपे, अशोक विघ्ने
रघुनाथ घोरपडे, अर्जुन घोरपडे, विशाल घोरपडे, लक्ष्मण घोरपडे, संतोष पवार, अक्षय घोरपडे, सोनाजी शिंदे,शेषराव घोरपडे, दशरथ घोरपडे, राहुल घोरपडे, संदीप घोरपडे, नामदेव घोरपडे,विनोद घोरपडे यासह गावातील सर्व महिला माता मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. गावातून अण्णाभाऊंच्या प्रतिमेची सुवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोलताना गोकुळ दौंड यांनी अण्णाभाऊंच्या कार्याबद्दल उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.
गोकुळ दौंड यांनी गावातील पाण्याच्या प्रश्नावरून लोकप्रतिनिधींवर जोरदार अशी टीका केली. तसेच गावाचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.