राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यांनी दाखल केले अर्ज

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नगराक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, नगराध्यक्षपद रिक्त होते. नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

नुकतेच राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारी (ता. 25) नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.

दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे पूर्ण बहुमत आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, मुंबई येथे उपचार घेत आहेत. ते येत्या गुरुवारी (ता. 24) राहुरीत येणार असल्याचे समजते.

जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, पालिकेतील गटनेत्या डॉ. उषा तनपुरे, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बैठकीनंतर एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts