Maharashtra News : केंद्र व राज्य सरकारने खाण्यासाठी बंदी घातलेला मांगूर मासा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडून या ट्रक मधील तब्बल तीन टन मांगूर मासा ग्रामस्थांनी पकडल्याची घटना बोटा येथे बुधवारी सायंकाळी घडली.
मांगूर मासा खाण्यासाठी व विकण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. असे असतानाही काहीजण या माशाची विक्री करतात. बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेश मधील एका ट्रक मध्ये तब्बल तीन टन मांगूर माशाची वाहतूक केली जात होती.
काही ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या ट्रकला पकडले. याबाबत घारगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळतात घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून ट्रक जप्त केली.
या ट्रकमध्ये २ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मांगूर मासा ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मत्स्य अधिकाऱ्यांना बोलाविले अधिकाऱ्यांनी पंचनामा करून या माशांची विल्हेवाट लावली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.