Ahmednagar News : ग्रामीण सह शहरीभागात देखील चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. नगर शहरात तर एकाच दिवशी ५ ते ६ घरे भरदिवसा फोडून मोठा ऐवज लंपास केला आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून आता ग्रामीण भागात देखील आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जनावरे, शेळ्या , शेतीची अवजारे, त्यानंतर शेतात असलेली पिके देखील चोरटे चोरून नेत आहेत. नुकतेच शेवगाव तालुक्यात एकाच दिवशी ५ दुकाने व एक मंदिरातील दानपेटी चोरून नेली होती.
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे एटीएम मशीन फोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. यापूर्वी जिल्ह्यात एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याचे प्रकार घडले आहेत.
तर काही ठिकणी चक्क एटीएम मशीनच तोडून नेल्याचा घटना घडल्या आहेत. अशीच घटना पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे घडली . मात्र नागरिकांमुळे चोरट्यांचा हा डाव फसला अन्यथा मोठी रक्कम चोरटे घेऊन पसार झाले असते.
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे बुधवारी रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी इंडिया वन कंपनीचे एटीएम तोडफोड करून चोरून घेऊन चालले होते. त्या वेळी कोरडगाव येथील बाळासाहेब देशमुख यांना जाग आली.
त्यानंतर देशमुखांनी इमारतीवर जाऊन चोरट्यांवर विटकरीचा मारा केला. त्यानंतर आसपासचे नागरिक जमा झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच रात्री गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण पोटे, चालक किशोर पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत एटीएमची मोडतोड करण्यात आली.
या एटीएममधील रक्कम चोरट्यांना काढता आली नाही. एटीएम मशीन गाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. मात्र, देशमुख यांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला. व चोरटे एटीएम तेथेच टाकून पळून गेले.
बुधवारी
सकाळी पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक तांबे यांनी घटनास्थळी देऊन पाहणी केली. या प्रकरणी इंडिया कंपनीचे भागीदार गणेश भेट वन बाबासाहेब माने (रा. बीड) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.