राष्ट्रीय ओलम्पियड अबॅकस स्पर्धेत अथर्व लोटके द्वितीय

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लस क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

यामध्ये तीन विद्यार्थी चमकले असता या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

ऑक्टोबर मध्ये झालेल्या राष्ट्रीय ओलम्पियड अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लस कलासचा विद्यार्थी अथर्व लोटके याने दुसरा क्रमांक पटकावला. त्याने 3 मिनिटांत 80 पैकी 73 गणिते सोडवले.

पार्श बंब आणि आर्य गायकवाड या दोन्ही विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांना संचालक प्रतीक शेकटकर आणि संचालिका शाहीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts