अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- जागेच्या वादावरून पती-पत्नीला बंदुक डोक्याला लावून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली.
याप्रकरणी सात जणांविpरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिशान शेख, अशोक शेकडे, तन्मीर नसीर शेख व चार अनोळखी (सर्व रा. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुलदीप सुदाम भिंगारदिवे (वय 38 रा. यशोदानगर, पाईपलाईन रोड सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी भिंगारदिवे व आरोपी यांच्यामध्ये जागेच्या वादातून न्यायालयात केस सुरू आहे. त्यांच्यात वाद देखील झाले आहे. भिंगारदिवे व त्यांची पत्नी भाजी आणण्यासाठी यशोदानगर भाजी मार्केटमध्ये जात असताना आरोपी तेथे आले.
मागील भांडणाच्या कारणातून व न्यायालयात चालू असलेल्या जागेच्या वादातून आरोपींनी भिंगारदिवे दांपत्यास मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानीत करण्याच्या उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ केले.
डोक्याला बंदुक लावून पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला व परिवाराला संपविण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे हे करीत आहेत.