Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. परंतु या पावसाने खूप नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यात तब्बल १५,३०७ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे तसा अडका जाहीर केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः पारनेर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, अकोले तालुक्यांत प्रचंड नुकसान जाहले. यात पारनेर तालुक्यातील आकडेवारी मोठी आहे. या तालुक्यांत केळी, पपई, मका पिकांचे मोठे नुकसान झालेय.
पपईच्या बाग पूर्ण उध्वस्त झाल्यात. दरम्यान नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असून, हिवाळी अधिवेशनापूर्वीच पंचनामे पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देखील कावरच मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
रविवारी रात्री झालेल्या अवकाळीने अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी तालुक्याला झोडपले. काही ठिकाणी गारपीट झाली. दक्षिण भागाचा विचार केला तर पारनेर, पाथडीं, शेवगाव, नगर, नेवासे तालुक्यातही नुकसान झाले आहे.
खरिपाचे एक पीक गेले होते परंतु आता राबीच्याही पिकांचेही नुकसान झाले आहे.
* १५ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
जिल्ह्यात अवकाळीने ‘अवकळा’ आणली आहे. तब्बल १५ हजार ३०७ हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत. प्रशासनाने देखील पंचनाम्यास जोर लावला आहे.
११ नोव्हेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हे पंचनामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.