अहमदनगर बातम्या

आयुष्यमान भारत योजना : रेशन कार्डची अट रद्द करण्याची मागणी

Ayushman Bharat Yojana : आयुष्यमान भारत मिशन योजनेतील रेशन कार्डची अट रद्द करुन, आधारकार्ड प्रमाणे सलग्न करावे. अशी लेखी मागणी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य मयूर हुंडेकरी यांनी आयुष्यमान भारत मिशन कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्याकडे केली आहे.

याबाबत हुंडेकरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारची आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपण कक्ष प्रमुख झाल्यापासुन काम गतिमान झाले आहे. आपण यातील बऱ्याच अटी दुर करुन ग्रामीण भागातील जनतेला दिलासा दिला आहे.

ही योजना प्रभावीपणे राबवित असतांना काही रेशनकार्ड संदर्भात अडचणी आहे. या योजनेमध्ये समावेश होण्यासाठी रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. परंतु बरेचशे रेशनकार्डधारक आतापर्यंत ऑनलाईन झालेले नाही तरी नवविवाहीत व नवजात बालक यांचा लवकर समावेश रेशनकार्डमध्ये होत नाही.

म्हणुन ते या योजनेपासुन वंचित राहत आहेत आणि ग्रामीण भागात बहुतांश कामे हे शेतकरी असल्याने शेतात काम करत असतात, त्यामुळे त्यांची बोटांचा बराचसा भाग भेगा पडल्यामुळे अंगठा किंवा इतर बोटांचे ठसे ऑनलाईन जुळत नाहीत.

त्यामुळे त्यांचे रेशनकार्ड ऑनलाईन असुन देखील त्यांची नावे कधी कधी दिसुन येत नाहीत. तालुका स्तरावरील मल्टिस्पेशालिटी व ऑर्थोपेडिक रुग्णालयांचा यामध्ये समावेश करावा. आपन रेशनकार्ड व्यतिरिक्त आधार कार्ड नुसार किंवा रेशनकार्डचा डेटा लवकरात लवकर अपलोड करण्यासंबंधी सुचना द्याव्यात असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मयूर हुंडेकरी, सेवा संस्थेचे माजी चेअरमन महादेव घोरतळे, पत्रकार अनिल कांबळे, रावसाहेब निकाळजे, बाळासाहेब खेडकर, जयप्रकाश बागडे, उद्धव देशमुख, इसाक शेख, पांडुरंग निंबाळकर, किरण तहकिक, आफताब शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts