अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : भंडारदरा,मुळा धरण किती भरले ? निळवंडेच्या पाणीसाठ्यात वाढ !

Ahmednagar News : मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. भंडारदरा धरणातील पाण्याची आवक दिवसभरात कमी झाली असली तरी रविवारी सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ६० टक्के झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या छत्तीस तासांत भंडारदरा धरणात अर्ध्या टीएमसीहून अधिक पाण्याची आवक झाली होती.

त्यामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. मात्र, रविवारी सकाळी सहा वाजता धरणात २५० दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आणि पाणीसाठा ६० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच ६ हजार ५३० दलघफू इतका झाला होता.

दरम्यान, रविवारी दिवसभरात १०७ दलघफू नवीन पाण्याची आवक होत धरणातील साठा ६० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ६ हजार ५३० दलघफू झाला होता. वाकी येथील लघु पाटबंधारे तलावाच्या भिंतीवरून १ हजार २२ कुसेकने पाणी प्रवरा पात्रात पडत आहे.

यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, रविवारी सकाळी या धरणातील पाणीसाठा १ हजार ९७२ दलघफू झाला होता. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याने रविवारी सकाळी सहा वाजता कोतुळजवळील मुळेचा विसर्ग शनिवारच्या तुलनेने कमी म्हणजेच २ हजार ४४१ कुसेक इतका होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts